वैनगंगा नदी पात्रात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह….

81

ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना एक मृतदेह एका झुडपात अडकलेल्या अवस्थेत नदीतील पाण्यात आज ६ जुलै रोजी सकाळी दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून वैनगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हा मृतदेह लांबून आला असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे
लागलीच मृतदेहाला पाहण्यासाठी नागरिकांची बघ्यांची गर्दी उसळली सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली आहे.