
बल्लारपूर(प्रतिनिधी)-
वनपरिक्षेत्र बल्लाशाह अंतर्गत मौजा बामणी ग्राम पंचायत सभागृहात जागतिक पर्यावरण दिननिमित्त शेतकऱ्यांना मोफत बांबू सीड बॉल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार, बामणीचे सरपंच सुभाष ताजने,तहसीलदार संजय राइंचवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश गेडाम,बल्लारपूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे प्रगतशील शेतकरी साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी,तसेच, बचत गटाचे सदस्य, सरल फाऊंडेशन या अशासकीय संस्था चे पदाधिकारी यांना मोफत सीड बॉल वितरण करण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांच्या कल्पनेतून हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,कार्यक्रमाचे संचालन राजेश बट्टे यांनी केले तर वनरक्षक राकेश शिवणकर यांनी आभार मानले
याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमास सर्व क्षेत्र सहायक,वनरक्षक,कार्यालयीन कर्मचारी ,वनमजुर,शेतकरी,विविध संस्थेचे पदाधिकारी,उपस्थित होते

