निमगाव सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेसची सत्ता

49

नुकत्याच पार पडलेल्या सेवा सहकारी संस्थेची अविरोध कॉंग्रेस प्रणित पॅनलचे 13 उमेदवार अविरोध निवडून आले. सदर निवडणूक राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली व मा संदीप पाटील गड्डमवार माजी अध्यक्ष मध्यवर्ती बँक व मा दिनेश पाटील चिटनूरवार माजी बांधकाम सभापती यांच्या सहकार्याने व माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच राजू पाटील ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.अध्यक्ष पदी सलग दुसऱ्यांदा चरणदास चिमुरकर यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदी नामदेव गेडाम यांची निवड करण्यात आली.सदस्य पदी लालाजी चौधरी, श्रीकांत करकाडे,कवडुजी म्हशाखेत्री,पुरुषोत्तम ठाकरे,लीलाधर ठाकरे,गुरुदास ढोले,रमेश गोवर्धन,रोशन चालीगाणजेवार,श्रीरंग नागपुरे,ताराबाई गंडाटे,यांची निवड झाली,

सदर निवडणूक अविरोध करण्याकरिता काँग्रेस कार्यकर्ते सुरेशजी शेरकी, युवा कार्यकर्ते संकेत सा बल्लमवार,लंकेश लाकडे,कमलेश रामटेके,मनोज करकाडे, सुरेशजी हुलके या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.