Home
Homeमहाराष्ट्रपर्यावरण दिन हा सरकारी कार्यक्रम पेक्षा पर्यावरण संरक्षणाची सर्वांचीच जबाबदारी आहे -आमदार...

पर्यावरण दिन हा सरकारी कार्यक्रम पेक्षा पर्यावरण संरक्षणाची सर्वांचीच जबाबदारी आहे -आमदार सुभाष धोटे

राजुरा(प्रतिनिधी)-
वाढते प्रदूषण ,वृक्षतोड,निसर्गातील होत असलेला बदल यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे यास मानव समाजच विकासाचे नावाखाली कारणीभूत आहे ,म्हणूनच पर्यावरण दिन केवळ सरकारी कार्यक्रम न करता प्रत्येकाने स्वताची जबाबदारी म्हणून कर्तव्य केले पाहिजे,,असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले
प्रास्ताविक मधून वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी ग्लोबल वार्मिंग,जागतिक हवामान बदल,वाढते उद्योगधंदे,कार्बनडाय ऑकसाईड चे वाढते प्रमाण यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे,म्हणून वृक्ष लागवड करणे,वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे, आयपीसीसी या संस्थेचे कार्य व अहवाल जगातील किमान 148 देश हा कार्यक्रम साजरे करतात,असे मनोगत केले.

राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत जागतीक पर्यावरण दिन निमित्य कार्यक्रमात आमदार धोटे यांनीअध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले,याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे,वन विभागाचे प्रशासकीय अधिकारी सतीश चोपडे,वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड,शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाँक्टर राजेश खेराणी,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी,प्राध्यापक गुरुदास बलकी ,डाँक्टर सारिका साबळे उपस्थित होते.

यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यानी वन उद्यान परिसर,रोपवाटिकेत जाणाऱ्या मार्गातील स्वच्छता केली तसेच मान्यवरांचे हस्ते वन उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
उपस्थित मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले कार्यक्रमचे संचालन क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर यांनी केले तर वनरक्षक सुनील गाजालवार यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी नागरसेवस्क गजानन भटरकर,हरजितसिग संधू,अडव्होकेत चांदेकर,तसेच शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी,क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,संतोष संगमवार, आनंदराव मत्ते,तथा सर्व वनपाल,वनरक्षक,वनमजुर उपस्थित होते
सदर कार्यक्रम उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल यांच्या मार्गदर्शनात पार पडले

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !