
लाचलुचपत विभागाची कारवाई;वनविभागात खळबळ

सावली वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पाथरी उपवन क्षेत्राचे वनपाल ला लाच घेताना लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्यांनी शुक्रवार रोजी अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
लाचलुचपत विभागाच्या चमूने दिनांक 3 ला शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास पाथरी येथील उपवनविभागाचे वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे (वय ४०) यास (१०००००)एक लाख रु रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार यांनी गावातील शेतकरी यांच्या शेतातील कटिंग केलेले सागवान लाकुड वाहतूक करण्याकरिता लागणाऱ्या ठेकेदाराकरिता निर्गत परवाना (T.P.) देण्याच्या कामाकरिता पाथरी येथील उपक्षेत्र येत असलेल्या वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे यांनी तक्रार दाराकडून (१,०२०००) रुपयाची मागणी केली होती त्यानंतर तडजोडीअंती शुक्रवार रोजी शासकीय निवासस्थानी (१०००००) रुपये स्वतः वनपाल यांनी स्वीकारले यात लाचलुचपत विभागाने सापळा रचत वनपाल यांना पोलीसांनी रंगेहात अटक केली.
ही कारवाई राकेश ओला, पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर. मधुकर गीते, अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वी. नागपूर तसेच पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे ला. प्र. वी. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात शिल्पा भरडे, रमेश दुपारे, नरेश नन्नावरे, रवीकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.