
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी मोनल विलास बनकर(मेश्राम) ही दुचाकीने राजुरा येथील घरी परत येत असताना राजुरा बसस्थानक समोरील तहसील कार्यालय समोरील वळणावर अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 3 जून रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली,

मोनल मेश्राम(बनकर) ही बल्लारपूर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे काही महिनेपूर्वी राजुरा पोलीस ठाण्यातून तिची बदली झाली होती कार्यतत्पर,सर्वप्रिय अशी तिची ओडख,परंतु आज ती सायंकाळी आपली नियमित कर्तव्य करून बल्लारपूर कडून आपल्या मायस्ट्रो कँपणीच्या दुचाकीने घरी लहान बाळ असल्याने आतुरतेने राजुराकडे स्वघरी येत होती परंतु काळाला ते मान्य नव्हते राजुरा शहरात प्रवेश करताच बस स्थानक समोरील वर्दळ पार करीत जात असतानाच मागून भरधाव वेगात अज्ञात वाहन आले त्या वाहनापासून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्नात तहसील कार्यालय समोरील पंचर दुकान समोर वळणावर तिच्या दुचाकीला अपघात झाला यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागीच गतप्राण झाली घटनेची माहिती होताच राजुरा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई करीत त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे याघटनेमुळे त्या महिला पोलीस ज्या भागात राहत होत्या त्या वार्डात हळहळ व्यक्त होत आहे तिचे पती विद्युत विभागात लाईनमेन पदावर असून एक लहान बाळ असल्याचे समजते
रस्त्यावरील अतिक्रमण या अपघातास कारणीभूत असल्याचा अपघात स्थळी नागरिकांनी आरोप केला तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणारे पोलिसांचीही याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे