Home
Homeमहाराष्ट्रतेलुगु भाषिक विडी कामगार महिला आणि मुलींसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण..

तेलुगु भाषिक विडी कामगार महिला आणि मुलींसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण..

——————————————

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचा उपक्रम..
——————————————

*सोलापूर* : वैयक्तिक रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी तेलुगु भाषिक विडी कामगार महिला आणि मुलींसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिले आहे.

विड्या वळताना होणारा त्रास भविष्यात धोकादायक आहे. हे कळून येत नाही. या उद्योगात असणाऱ्या महिला विडी कामगार महिलांनी ओळखून असायला हवे. पण, तसे होताना दिसत नाही. पर्यायाने दुसर्‍या व्यवसायात कमी प्रमाणात वर्ग होताना दिसतात. यासाठी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने छोटासा प्रयत्न म्हणून विडी उद्योगात असणाऱ्या तेलुगु भाषिक महिला विडी कामगार आणि मुलींसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षणाचे उपक्रम हाती घेतला आहे. याचे प्रशिक्षण सौ. गिरिजाताई जगदीश गाजूल ह्या देणार आहेत. त्यासाठी नावनोंदणीची आवश्यकता आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी ३ दिवसांचा असून दररोज ३ तास असणार आहे.११ जून पर्यंत नांवे नोंदवावीत. त्यानंतर प्रशिक्षण स्थळाची माहिती दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत फ्रॉक, आणि ड्रेस व ब्लाऊजच्या विविध प्रकारात असून हे शिकवण्यात येतील. जास्तीत जास्त तेलुगु भाषिक महिला विडी कामगार आणि मुलींनी नांवे नोंदवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 9021551431 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम (काका), उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामुर्ती, लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, प्रा. अनुप अल्ले यांनी केले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !