जाळलेल्या प्लास्टिकच्या राखेची विल्हेवाट..?

39

 

सावली नगरपंचायत ची सारवासारव..!

 

नगरपंचायत सावली च्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून शहरातील गोळा केलेल्या प्लास्टिकला जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून आग लावले व ते नष्ट केल्या जात असल्याचे वृत्त प्रकाशित होतात सावली नगरपंचायतीने सावरासावर करुन जाळलेल्या प्लास्टिकचा राखेची विल्हेवाट लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून असे स्पष्ट होते की नगर प्रशासनाने जाणून-बुजून प्लास्टिक जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर चौकशीच्या भीतीपोटी प्लास्टिकचा राखेची विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार समोर येत असून या प्रकरणाची पर्यावरण मंत्री यांना तक्रार करण्यात येणार असून प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरळीत राहावे हा मुख्य उद्देश ठेवून शहरातील केरकचरा, टाकाऊ पदार्थ, घाणीचे व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी निविदा काढून घनकचरा व्यवस्थापनाचे काम केल्या जाते. सावली नगरपंचायत अंतर्गत घन कचरा संकलनासाठी डेपो ची निर्मिती करण्यात आली आहे.

यामध्ये शहरातील घनकचरा , प्लास्टिकचे साठवणूक केल्या जाते. मात्र सावली नगर प्रशासन बाजार ओट्याजवळ गोळा झालेल्या प्लास्टिकला आग लावून नष्ट करीत होते. त्यामुळे घनकचरा डेपो पासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या वस्तीच्या रहिवाशांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले.

परिणामी नगर प्रशासन प्लास्टिकला आग लावल्याने याचे दुष्परिणाम मानवी जीवनावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच पुढे या प्रकाराच्या चौकशीच्या भीतीपोटी नगर प्रशासन सावरासावर करुन जाळलेल्या प्लास्टिकचा राख कामगारांकडून जमा करून ते कचरा गाडीने बाहेर फेकण्यात येत असल्याचे दिसते म्हणजे या प्रकरणी चौकशी झाली तर तसे झालेच नाही म्हणण्यासाठी हे अधिकारी खटाटोप करीत असल्याचे आज दिसले.

सदर जळालेले राख फेकले मात्र त्या परिसरातील जागा तर आगी ने काळी पडली हे मात्र ते विसरले असून या प्रकरणाची महाराष्ट्र चे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे तक्रार करण्यात येणार आहे.

*बॉक्स*

सावली नगरपंचायत मध्ये घनकचरा व्यवस्थापन च्या माध्यमातून सर्व सावळा गोंधळ सुरू असून चार वर्षांपासून गांडूळ खत प्रकल्पच नामधारी सुरू आहे? तसेच जागा नाही म्हणून प्लास्टिक जाळणे हाही प्रकार गंभीर आहे या सर्व प्रकरणाकडे चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुलाने यांनी लक्ष घालावे अशी मागणी सावली वासीयांनी केली आहे.

*बॉक्स*
ही सारवासारव चौकशी च्या भीतीपोटी करण्यात येत असून सदर प्रकरणाची तक्रार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे करून दोषी वर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल.
सतीश बोम्मावार, विरोधी पक्ष गटनेता न. प. सावली