अबब…सावली शहरात दिवसा पथदिवे सुरू !

87

 

सावली नगरपंचायत च्या वतीने सावली शहरात दिवे बत्ती ची सोय म्हणून अनेक ठिकाणी पथदिवे ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.मात्र सदर पथदिवे हे रात्रौला कधी कधी बंद असतात हे जरी सत्य असले तरी आज मात्र दुपार पर्यन्त पथदिवे सुरू असल्याने अनेक जणांना आश्चर्य वाटले असून नगरपंचायत चा भोंगळ कारभार हा या निमित्ताने पुढे आलेला आहे.

 

एकीकडे सूर्य आग ओकत आहे.उन्हाचे चटके अनेकांना बसत आहे.त्यामुळे अनेकांना डोळ्यावर गॉगल लावावा लागतो मात्र सावली नगरपंचायत ने दिवसाच अंधार असल्यासारखे पथदिवे सुरू ठेवल्याने आश्चर्य वाटत आहे.या कडे मात्र पदाधिकारी तथा मुख्याधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.असेच एकंदरीत दिसत असल्याचे सावली वासीयांचे म्हणणे आहे.