Home
HomeBreaking Newsघनकचरा व्यवस्थापनेतील प्लास्टिकला लावल्या जाते आग

घनकचरा व्यवस्थापनेतील प्लास्टिकला लावल्या जाते आग

 

 

नगरपंचायत सावलीच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून शहरातील गोळा केलेल्या प्लास्टिकला आग लावून नष्ट केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे घनकचरा डेपोपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या वस्तीच्या रहिवाशांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांचे दुर्लक्ष का असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

सावली शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे हा मुख्य उद्देश ठेवून शहरातील केरकचरा, टाकाऊ पदार्थ, प्लास्टिक इत्यादी चे व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांची निविदा काढून घनकचरा व्यवस्थापनाचे काम करीत आहे.मात्र ते काम थातूर मातूर तर नाही ना असा प्रश्न केल्या जात आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावरून लाखो रुपयांचा निधी पुरविला जातो. सावली नगरपंचायत अंतर्गत घनकचरा संकलनासाठी डेपोची निर्मितीसुद्धा सावली शहराला लागून करण्यात आली आहे. यामध्ये सावली शहरातील घनकचरा, प्लास्टिकची साठवणूक केली जाते. मात्र सावली नगर प्रशासनाकडून प्लास्टिक ला बाजार ओट्याजवळ आग लावून नष्ट करीत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना प्रदूषणास आमंत्रण दिले जात असून आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सावली नगर प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. मात्र एवढे होऊन या प्रकरणाकडे मुख्याधिकारी मनीषा वजाळे हे दुर्लक्ष करीत आहे.तसेच कामावर असलेल्या मजुरांना सुद्धा सुविधा पुरवीत नसल्याने कंत्राटदार ला कुणाचे अभय आहे असा प्रश्न व्यक्त केल्या जात आहे.तसेच नगर प्रशासनातील काही अधिकारी हे घनकचरा व्यवस्थापनातील मजुरांचा आपल्या खाजगी व कार्यालयीन कामाकरिता उपयोग करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधितावर त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

############
शहरातील गोळा झालेला प्लास्टिक हे ठेवण्याची अपुरी जागा डेपोमध्ये असल्याने काही प्लास्टिक जाळल्या जात आहे.मात्र इत्तर असलेला प्लास्टिक लवकरच हा अंबुजा पाठविणार आहोत.
– प्रणाली दुधबळे अभियंता स्वछता व पाणीपुरवठा नगरपंचायत सावली

#######
आमच्या आरोग्याची काळजी सावली नगरपंचायत ला असती तर गावालगत घनकचरा चा डेपो लावले नसते.वारा आली की दुर्गंधी सुटते तसेच आता प्लास्टिक जाळत असल्याने प्रदूषण निर्माण करीत आहे.व घरापर्यंत आग येऊ शकते यापूर्वी असा प्रकार घडला होता मात्र याकडे सर्वच जण जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.
प्रशांत निमगडे,
रहिवाशी,सावली

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !