Home
HomeBreaking Newsजिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न ;दोन वर्षांनंतर...

जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न ;दोन वर्षांनंतर मिळाला मुहूर्त…

 

प्रा आरोग्य केंद्र नविन ईमारती मधुन रुग्नाना उत्कूष्ट आरोग्य सेवा द्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आव्हान

सावली प्रतीनिधी

जिबगाव – सावली तालुक्यातील जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधुन दोन तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती .पण दोन वर्षांनंतर आज दिनांक २९/५/२०२२२ ला लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त निघाला . राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य यांनी वारंवार जिल्याचे पालकमंत्री मा विजय भाऊ वडेटीवार व चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार मा अशोकभाऊ नेत,मा सुधिरभाऊ मुंनगटीवार माजी पालकमंत्री,मा डॉ.गहोलत साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत होते.

त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत उद्घाटनाची तारीख निश्चित करुन आज दिनांक २९/५/२०२२ ला लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. .यावेळी उद्घाटन म्हणून मा.विजय भाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री व पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.त्यावेळी मानुसकीचा खरा धर्म हा सेवा आहे रुग्नालयात आलेल्या रुग्नाना आपुलकीने आणी प्रेमाने वागनुक दिल्यास त्याची अर्धी बिमारी तेथेच नष्ट होते वेदना घेवुन आलेला रुग्नानवर सौजाण्याची फुंकर मारुन रुग्नाना उत्कूष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी नेहमी प्रयत्न शिल राहावे असे प्रतीपादन मा विजय वडेट्टीवार पालकमंत्री यानी लोकार्पन सोहळा कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते यावेळी उपस्थित दिनेश पाटील चिटनुरवार माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपुर विजय भाऊ कोरेवार माजी सभापती प.स.सावली. नगराअध्यक्ष लताताई लाकडे. नितीन गोहणे कांग्रेस तालुका अध्यक्ष. परीक्षित पाटील तहसीलदार साहेब सावली.ठानेदार आशिष बोरकर सावली पो स्टेशन. डॉ. गहलोत जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर.पुरुषोत्तम चुदरी सरपंच जिबगाव.राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य जिबगाव.डॉ.थेरे सर तालुका आरोग्य अधिकारी सावली.श्रीमती सुनिताताई मरस्कोले संवर्ग विकास अधिकारी प.स.सावली नितीन गोहणे कांग्रेस तालुका अध्यक्ष सावली.डॉ गोबाडे सर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव.डॉ.वाघधरे साहेब वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सावली.डॉ.देवगडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव.प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील सर्व कर्मचारी.आशा वर्कर .व गावातील नागरिक उपस्थित होते. यावळी प्राथमीक आरोग्य केद्राची नवीन ईमारत अतीशय सुंन्दर अशी बाधलकी आहे असे सागुन पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले जिबगांव येथील प्रा आरोग्य केंद्राचे लोकार्पन लवकर व्हावे अशी ईच्छा जिबगांव वासीय व परीसरातील जनतेची होती ती पन आता आपली ईच्छा पुर्ण झाली असुन प्रा आरोग्य केंद्र नविन ईमारती च्या परीसरात सौदरी करण स्टिट लाईट एक्सरे मशिन जनरेटर आदी मागण्या लवकरच पुर्ण केल्या जातील असे या प्रसंगी सागण्यात आले त्यावळी सुत्रसंचालन ठिकरे सर यांनी केले.व आभार प्रदर्शन डॉ.थेरे सर तालुका आरोग्य अधिकारी सावली यांनी मानले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !