
गांडूळ खत नसल्याने प्रकरण आले उघडकीस !

नगरपंचायत सावली च्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून गांडूळ खत प्रकल्पाची निर्मिती करण्यात आहे. मात्र गेल्या चार वर्षापासून त्या गांडूळ खत सध्या बेपत्ता असल्याने हा गांडूळखत गेला कुठे की फक्त देखावा तयार केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सावली शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरळीत राहावे हा मुख्य उद्देश ठेवून शहरातील केरकचरा, टाकाऊ पदार्थ, घाणीचे व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी निविदा काढून घनकचरा व्यवस्थापनाचे काम केले जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी पुरविला जातो. सावली नगरपंचायत अंतर्गत घन कचरा संकलनासाठी डेपो ची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच डेपोमध्ये गांडूळ खत निर्मिती प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु मागील चार वर्षा पासूनचे गांडूळ खत आढळून आला नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन येथील गांडूळखत लंपास झाला की विकला गेला? की फक्त देखावा तयार केला असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र अधिकारी सदर बाबीवर बोलण्यास तयार नसल्याने संशयाची सुई वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
घनकचरा व्यवस्थापन याबरोबरच गांडूळ खत निर्मितीसाठी सुद्धा शासनाकडून निधी उपलब्ध केल्या जाते. त्या निधीमधून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात तात्पुरत्या स्वरुपात टाके उभारण्यात आले आहेत. परंतु त्या टाकीच्या तळाशी गव्हाचा कोंडा, भाताचे तूस, 3 ते 5 सेमी जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर देणे बंधनकारक आहे. तसेच ओला कचरा पासून हा प्रकल्प तयार करायचे आहेसाधारणता पूर्णपणे प्रौढ झालेले 100 किलो गांडूळ महिन्याला एक टन खत तयार करतात.परंतु सदर प्रतिनिधीने सदर प्रकल्पाला भेट दिली असता तसे काही आढळून आले नाही. तर टाक्यांमध्ये मातीची साठवण केली असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे खत तयार न करता अधिकारी व कंत्राटदार हे देखावा तयार करून या साठी चा निधीचा अपहार तर केले नाही ना?असा संशय व्यक्त केल्या जात आहे.त्यामुळे सदर प्रकल्पाची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
*बॉक्स-*
हा कागदोपत्री पुरस्कार साठी प्रकल्प केले? -सतीश बोम्मावार, विरोधी पक्ष गट नेता नप सावली
गेल्या चार वर्षांपासून जर गांडूळ खत प्रकल्प आहे तर मग एवढ्या दिवसाचा खत गेला कुठे,विक्री केले असेल तर निधी किती आहे.मात्र तसे तर प्रकल्प पाहिल्यावर काहीच दिसत नाही म्हणजे कागदोपत्री पुरस्कार साठी प्रकल्प तयार केले का?याची चौकशी करून दोषी वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावली नप चे विरोधी पक्ष गट नेते सतीश बोम्मावार यांनी केली आहे.
*बॉक्स-*
मला माहिती नाही-मुख्याधिकारी
घनकचरा व्यवस्थापन च्या माध्यमातून गांडूळ खत प्रकल्पा बाबत मला माहिती नाही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माहिती चा अधिकारी टाका व माहिती घ्या असे मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी म्हटले.
