सामदा घाटावर रेतीचे पाच ट्रॅक्टर पकडले.

64

 

महसूल विभागाची कार्यवाही

सावली तालुक्यातील सामदा बुज. येथे रेतीची अवैद्य वाहतुक होत असल्याच्या माहीतीवरून सावली महसुल प्रशासनाने आज दिनांक 27 ला पहाटे 5 च्या दरम्यान धाड टाकून पाच ट्रॅक्टर जप्त केल्या. यामुळे रेती माफीयांमध्ये धडकी भरली आहे.

तालुक्यातील सामदा बुज येथील निंबाच्या घाटावरून नेहमीच रेतीची अवैद्य वाहतुक होत असल्याच्या तक्रारी होत्या.त्या आधारे सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे व कोतवाल राजू पेंदाम व सुधीर बाम्बोडे कर्मचाऱ्यांनी आज सकाळी पाच वाजता च्या सुमारास रेती घाटावर धाड टाकून पाच ट्रॅक्टर जप्त केल्या आहेत.व त्या सर्व सावली तहसील कार्यालयात जमा केले आहे.या सर्व ट्रक्टर वर प्रत्येकी एक लाख सोळा हजार रूपयांचा दंड थोटावला असुन त्यातुन पाच लाख अंशी हजार रूपयाचा महसुल जमा होणार असल्याचे सांगीतले आहे.

त्यात ट्रॅक्टर चालक गणेश जुवारे, प्रवीण देशमुख, सुभाष बारसागडे, गुरूदास झाडे सर्व रा. सामदा बुज. व नीतीन भांडेकर सोनापुर यांनाही नोटीस देण्यात आले आहेत.या धाडी मुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास सुरू आहे.