चंदनखेडा येथील उत्साही कार्यकर्ता राजू रणदिवे हरपला

45

चंद्रपूर  : – भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता राजू रणदिवे यांचे निधन.गावात गणपती स्थापना असो की इतर कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम उपक्रम किंवा चळवळ  ,अगदी  किशोरवयीन वयापासून कार्यक्रमात सक्रिय सहभाग पुढाकार जबाबदारी स्वीकारण्यास राजू हा तयार असायचा, धाडसी ,धोके पत्करणारा तो एक युवा कार्यकर्ता होता, गावात सार्वजनिक गणपती स्थापना ,मदतीसाठी नाट्यप्रयोग आयोजन,सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामसभा सहभाग ,गावाचे ग्रामदैवत सार्वधर्मीय  श्रद्धांस्थान श्री माधवराव महाराज देवस्थान घोडा उत्सव , महात्मा गांधी पुतळा देखरेख , अश्या विविध कार्यक्रम उपक्रमांत त्याचा तन मन धनाने सहभाग असायचा, काही वर्षपूर्वी गावात दारूचा महापूर वाढला असतांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चे पुढाकाराने महिलांना सोबत घेऊन दारूबंदी चळवळ यशस्वीपणे राबविली होती ,त्यात  राजुचे महत्वाचे योगदान राहिले होते ,हे कुणीही विसरन्यासारखे नाही, थोडा उनाड परंतु तितकाच धोके पत्करून पुढे धजावणारा तो साहसी प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ताच होता,

काही महीण्यापासून तो आजाराने ग्रस्त होता, अशातच दि 27 मे ला सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान अवघ्या 38  वर्षतच त्याला काळाने हिरावून नेला, आज तो दूर निघून गेला ,तरी राजुच्या स्मूती सामाजिक योगदान सदोदित आठवणीत राहणारे आहे ,यात तीळमात्र शंका नाही, त्याच्या स्मृतिस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण !💐💐💐💐👏💐💐💐