
गडचिरोली वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील व्दार संचलन कार्यक्रमानुसार सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी. असून 15,00 मीटरलांबीचे व 9.00 मी. उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जुन पासुन सुरु होत आहे बॅरेज मध्ये साठवलेला पाणीसाठा कमी करुन सर्व 38 दरवाजे 1 जुन 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे.

त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जिवीत व वित्त हानी होवु नये म्हणून सर्व लगतचे गावांना/ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की, त्यांनी आपले गावक-यांना, याबाबत दवंडी व्दारे सुचीत करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावर शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात.
जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात.
मार्केडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, रेती घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे अशा जनतेने खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी कळविले आहे.
