
ठाणेदार त्या कोलामासाठी देवदूत ठरले
विरुर स्टेशन( संतोष कुंदोजवार /तिरुपती नल्लाला)-

अनेक वर्षांपासून नाल्यात चर खोदून पाणी पिणाऱ्या कोलामाची अखेर एका पोलीस अधिकार्याच्या पुढाकारातून हातपम्प बसवून देण्यात आल्याने हा पोलीस अधिकारी कोलामासाठी देवदूत ठरले आहे
राजुरा तालुक्यातील अति दुर्गम तेलंगणा सीमेलगत कोष्टळा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर 25 घराचे बगलवाही नावाचे कोलाम वस्ती आहे,डोंगरगाव प्रकल्पामुळे ते कोलाम विस्थापित झाले अनेक वर्षांपासून लागूनच असलेल्या जंगलात झोपडी बांधून राहत आहेत वनसंवर्धन कायद्यामुळे या वस्तीला मूलभूत सुविधा मिळत नाही पिण्याच्या पाण्यासाठी वस्तीला लागून असलेल्या नाल्यातील पाणी पिऊन राहावे लागत आहे उन्हाळ्यात तर नाल्यात चर खोदून ओंजळीने पाणी भरून न्यावे लागते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही मूळ निवासी असलेल्या कोलाम मात्र मूलभूत सुविधापासूनच वंचित आहेत
दरम्यान एके दिवशी विरुर पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण आपल्या कर्मचार्यासह या मार्गावरून गस्त करीत असताना कोरड्या नाल्यात चर खोदून पिण्यासाठी पाणी नेणाऱ्या त्या कोलामाची विदारक चित्र बघितले
आणि त्या पोलीस अधिकार्याच्या संस्कारातील माणुसकी जागृत झाली लगेच त्या कोलाम वस्तीत जाऊन सर्व समस्या जाणून घेतले आणि लगेच विरुर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्याशी चर्चा केली सर्वांकडून लोकवर्गणी गोळा करून त्या कोलामवस्तीत दिनांक 25 मे रोजी एक हातपम्प बसवून दिले बाजूलाच वृक्षारोपण केले
यावेळी कोलामाचे चेहर्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता आणि स्वतः ठाणेदार राहुल चव्हाण यांनी हातपम्प हलवून उपस्थित कोलाम बांधवासोबत पाणी पिलेत ,अनेक वर्षांपासुन असलेली पिण्याचे पाण्याची समस्या एका पोलीस अधिकार्याच्या पुढाकाराने सतकर्मी कामी आले
हे सगळे पाहून त्या कोलाम बांधवांसाठी ठाणेदार राहुल चव्हाण देवदूतच ठरले असे म्हणणे वावगु ठरू नये
याप्रसंगी विरुर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी,बगलवाईचे पोलीस पाटील भोजु पाटील,लक्कलकोट येथील पोलीस पाटील महादेव बुजाडे,दिलीप जाधव,उमेद अभियानाच्या कार्यकर्त्या शीला जाधव ,तथा स्थानिक सर्व नागरिक उपस्थित होते