
ओबीसी आरक्षणाची हत्या करणार्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज भाजपा ओबीसी मोर्चाने मंत्रालयावर धडक दिली.
स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्रावर खापर फोडायचे, यापलिकडे गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही.
ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा हवा असताना आणि ते काम राज्य सरकारचेच असताना आधी केंद्रावर दोषारोप, नंतर न्यायालयात वेळकाढूपणा, मागासवर्ग आयोग नेमला तर त्याला सुविधा आणि निधी न देणे यामुळे ओबीसी समाजावर मोठाच अन्याय महाविकास आघाडी सरकारने केला आहे.

मध्यप्रदेशने मागासवर्ग आयोग गठीत केला. ट्रिपल टेस्टप्रमाणे कार्यवाही केली. न्यायालयाने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय सुधारित अहवाल मागितला, तर त्यांनी तेही काम केले. मग तेच काम महाविकास आघाडीला का जमले नाही?
जोवर ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोवर भाजपाचा संघर्ष थांबणार नाही!
आज या आंदोलनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर अनेक नेते, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
दडपशाही करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार !
#OBCReservation