मनरेगाच्या मजुरावर रानडुकराचा हल्ला:मजूर जखमी

85

 

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील मेहा (बू.)येथील मजुरावर आज सकाळचा सुमारास डुकराने हल्ला चढवून गंभीर रित्या जखमी केले आहे.

अशोक गणपत कोलते ,वय ४२ रा. मेहा (बु.) जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून रविवार रोजी सकाळच्या सुमारास रोजगार हमीच्या माध्यमातून जंगल व्याप्त असलेल्या तुकुम रोडवरील खोलीकरणाच्या कामास बरेच मजुर गेले असता अशोक कोलते हे सुद्धा होते परंतु त्याच ठिकाणी माणसांचा आवाज एकूण चवताळलेल्या रानटी डुक्कराणे त्याच्यावर हल्ला चढवीत गंभीर रित्या जखमी केले.

यादरम्यान इत्तर मजुरांनी धाव घेत त्या डुकराला पळवून लावले व जखमी ला अंतरगाव येथील दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार केले.या घटनेची माहिती वनअधिकाऱ्यांना कळताच घटनेचा पंचनामा करून जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले आहे.यावेळी पाथरी चे वनपाल वासुदेव कोडापे, वनरक्षक संदीप चुधरी, वन मजूर उपस्थित होते.