Home
Homeमहाराष्ट्रभारताचा प्रज्ञावंत एकाच वर्षात दुसऱ्यांदा जगतज्जेता...

भारताचा प्रज्ञावंत एकाच वर्षात दुसऱ्यांदा जगतज्जेता…

 

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने Pragyananda यावर्षी दुसऱ्यांदा बुद्धिबळ क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या बुद्धिबळ मास्टर मॅग्नस कार्लसनचा तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पराभव केला आहे. प्रज्ञानानंदने यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी एअर थिंग्स मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत कार्लसनचा ३९ चालींमध्ये पराभव केला होता. चेसबल मास्टर्स स्पर्धेतही दुसऱ्यांदा. बुद्धिबळ मास्टर्स ही १६ खेळाडूंची ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धा आहे.

 

या स्पर्धेत पाचव्या फेरीत प्रज्ञानंद Pragyananda आणि कार्लसन यांच्यात सामना रंगला होता. हा सामना अतिशय
रोमांचक होता. एकेकाळी हा सामना दोघांमध्ये अनिर्णित राहणार होता. त्यानंतर 40व्या चालीनंतर कार्लसनने मोठी चूक केली आणि त्याचा फटका त्याला पराभवासह सहन करावा लागला. ४० व्या चालीत चूक झाल्यानंतर पुढच्याच चालीत प्रज्ञानंदने कार्लसनचा पराभव केला. चेसबल मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसानंतर कार्लसन १५ गुणांसह तिसऱ्या
स्थानावर आहे, तर प्रज्ञानानंद १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. चीनचा वेई यी १८ गुणांसह अव्वल, डेव्हिड अँटोन १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

– क्रिकेटची आवड
चेन्नईच्या प्रज्ञानानंदने Pragyananda २०१८ मध्ये
प्रतिष्ठित ग्रँडमास्टर खिताब जिंकला. ही कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण खेळाडू होता आणि त्यावेळी जगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता. प्रज्ञानंद सर्वात तरुण ग्रँडमास्टर्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. ग्रँडमास्टर झाल्यापासून प्रज्ञानंदने सातत्याने प्रगती केली पण त्यानंतर कोविड- 19 महामारीमुळे अनेक स्पर्धा थांबल्या. प्रज्ञानंदला क्रिकेट आवडते आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो मॅच खेळायला जातो.

साभार -दैनिक तरुण भारत

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !