Home
HomeBreaking Newsआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीनुसार मुख्‍यमंत्र्यांची घोषणा. अपघातातील त्या मृतांच्‍या कुटूंबियांना...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीनुसार मुख्‍यमंत्र्यांची घोषणा. अपघातातील त्या मृतांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाखाची आर्थीक मदत जाहीर

चंद्रपूर-मुल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्‍या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेला ट्रक यांच्‍यात झालेल्‍या भिषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या ९ जणांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री निधीतुन मृतकांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्‍याची घोषणा केली आहे.

 

अजयपूर गावाजवळ झालेल्‍या भिषण अपघातादरम्‍यान मोठी आग लावून ९ मजूरांना भाजून मृत्‍यु झाला होता. या अपघातानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्‍यमंत्री निधीतुन मृतकांच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्‍याची मागणी केली होती. मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्‍याशी याबाबत त्‍यांनी चर्चा देखील केली. जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्‍ताव शासनाला पाठविण्‍याची विनंती केली. आ. मुनगंटीवार यांच्‍या मागणीची तातडीने दखल घेत मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी मृतकांच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !