कांग्रेस मध्येच दुफडी…सेवा सहकारी संस्था अध्यक्ष पदी विनोद भांडेकर

172

 

सेवा सहकारी संस्था मर्यादित सामदा ची निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली त्यात काँग्रेस समर्थित १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले.एकहाती सत्ता आल्या नंतर कांग्रेस चे नेते व बाजार समिती चे उपसभापती दिवाकर भांडेकर व कांग्रेस चे युवा नेते माजी उपसरपंच विनोद भांडेकर यांच्या मध्ये दुफडी निर्माण झाली.सत्ता असतांनाही गट तयार होणे हे भविष्यात धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.

दिनांक १८-५-२०२२ च्या अध्यक्ष/ उपाध्यक्ष पदाकरीता झालेल्या निवडणुकीत विनोद भांडेकर हे अध्यक्षपदी विराजमान झाले व उपाध्यक्ष पदाकरीता प्रशांत कोहळे हे विराजमान झाले.

दिवाकर पा भांडेकर गटाकडून ढिवरू पा कोहळे, अनिल पाल, पुरुषोत्तम कोहळे यांनी आपली प्रतिष्ठा पनाला लावली तर विनोद भांडेकर गटाकडून प्रभाकरजी सोमनकर व स्वतः विनोद भांडेकर यांनी आपली प्रतिष्ठा पनाला लावली होती. कांग्रेस चे नेते असलेल्या या संस्थेमध्ये कुणाच्या ऐकाने चालणार नाही असे म्हणत सत्ता परिवर्तन झाले आहे.मात्र हा चिंतनाचा विषय झालेला असून परिसरात या दुफडी ने अनेकांना आश्चर्य ही वाटत आहे.मात्र बाबत तालुक्यातील कांग्रेस चे सहकार चे नेतेही चूप चाप बसल्याचे दिसत आहे.

कांग्रेस च्या 13 विजयी सदस्या मध्ये दिवाकर पा भांडेकर, प्रशांत पुण्यप्रेडिवार, टीकाराम रोहनकर, अनिल कोहळे, सौ लीलाबाई कोहळे, विनोद भांडेकर, प्रशांत कोहळे, विलास भांडेकर, श्रावन साखरे, दामोधर भांडेकर, बाबुराव सुरपाम, मुकुंदा भांडेकर, सौ सयाबाई पिपरे हे सदस्य असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता 7 विरुद्ध 5 असे चित्र दिले.तर एक सदस्य अनुपस्थित होते.