अखेर त्या युवकाचे प्रेत वैनगंगेच्या नदी पात्रात कुजलेल्या अवस्थेत मिळाले

76

सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील रुपेश विलास सहारे वय 25 वर्ष हा युवक दिनांक 15 ला कामावर जातो म्हणून घरून निघून गेलाअस्था सायंकाळ ही लोटुन गेली पण रुपेश चा घरी काही पत्ता नाही त्यानंतर त्याची शोधाशोध केली असताना तो न मिळाल्याने त्यांचे वडील विलास मोतीराम सहारे यांनी दिनांक 17 ला सावली पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.

सदर तक्रारीमध्ये त्यांनी असे नमूद केले दिनांक 15 ला मला भेटण्यासाठी कोणीतरी येत आहे असे म्हणून तो गडचिरोली येथे जातो असे सांगून माझा मुलगा रुपेश घराबाहेर पडला त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तो क्रांती बार येथे स्वतःची सायकल ठेवला त्यानंतर तो दोन दिवस घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली.

त्यावरून पोलिसांनी शोधाशोध घेतली असता आज दिनांक 20 ला दुपारच्या सुमारास नदीच्या पात्रातील वाघोली उपसा जलसिंचन योजनेच्या जवळ त्याचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली.

त्यानुसार सावली चे ठाणेदार अाशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात दर्शन लाटकर व श्रीकांत वाढई हे घटनास्थळी गेले असता त्यांनी प्रेत बाहेर काढले. व सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलून घटनास्थळी त्याचा पंचनामा केला.

या घटनेचा पुढील तपास सावली पोलिस करीत आहे.