खेडी जवळ चालती दुचाकी पेटली…..

111

 

चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील खेडीजवळ प्रकाश खजांची यांच्या वाडी समोरील पूलिया वर सावली तालुक्यातील किसाननगर येथील रमेश तुलासिदास बीके यांची MH 34BK 66 40 या क्रमांकाची या क्रमांकाची डुएट ही गाडी अचानकपणे पेट घेतल्याने एकच खळबळ माजली.

सदरच्या वातावरण बघता मोठ्या प्रमाणात हवा असल्याने ही सदर आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण गाडीच जळत होती.गाडी जळत असल्याची माहिती सावली पोलिसांना मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर दुचाकी ला लागलेली आग विझविण्यात आलेली आहे.

यात मात्र जिवीत हानी झालेली नाही.सद्या उन्हाचा तळाखा असून सूर्य आग ओकत आहे.त्यामुळे दिवसेंदिवस अश्या आगी च्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसत आहे.