
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य , विज्ञान महाविद्यालय सावली राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शारीरिक शिक्षण विभागांच्या वतीने काऊंट डाऊन योग शिबिर दि १४ मे २०२२ ला महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आले यावेळी योग प्रशिक्षक मा. रोशन तिवाडे, मा. प्रफुल्ल निरूडवार उपस्थित होते.

निरामय जीवनासाठी योग महत्त्वपूर्ण असून योगाच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभत असते तरी नियमित योग करण्यात यावे असे मार्गदर्शन व योग प्रात्यक्षिकांचा सराव याप्रसंगी करण्यात आला यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप कामडी , डॉ. रामचंद्र वासेकर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.भास्कर सुकारे प्रा. देविलाल वाताखेरे , डॉ.सचिन चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
