भाजपा ओबीसी तर्फे व्याहड खुर्द येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात उद्या आंदोलन

55

 

भारतीय जनता पार्टी तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपुर यांच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये भाजपा सरकार असलेल्या शिवराज सरकार मुळे ओबीसी ला न्याय मिळाला मात्र महाराष्ट्र च्या महाभकास आघाडी सरकार हे फक्त टोलवा टोलवी करून वेळ मारून नेत असल्याने येथील ओबीसी समाज हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पासून दूर आहे.त्यामुळे या महाभकास सरकार च्या विरोधात दि.20-05-2022
सकाळी ला 10.00 वा व्याहाड खुर्द (टि-पाईंट) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत.

या आंदोलनाचे नेतृत्व लोकलेखा समीती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार,राष्ट्रीय ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हंसराज भैय्या अहीर,खासदार अशोक नेते,आमदार बंटी भांगडीया,माजी आमदार अतुल देशकर,जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, राजू पा देवतळे उपाध्यक्ष प्रदेश मोर्चा प्रकाश बगमारे प्रदेश सदस्य, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांच्या उपस्तीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

तरी सर्व पदाधिकारी तथा ओबीसी समाज बांधव,भगिनी यांनी सदर आंदोलनात उपस्थित रहावे व आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन भाजपा ओबीसी जिल्हा अध्यक्ष तथा भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.