Home
Homeमहाराष्ट्रटंचाईग्रस्त कोदेपार गावात अखेर पाणीपुरवठा सुरु

टंचाईग्रस्त कोदेपार गावात अखेर पाणीपुरवठा सुरु

संजय गजपुरे यांच्या भगीरथ प्रयत्नाने पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास
================
नागभीड तालुक्यातील मिंडाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोदेपार गावात वर्षभरच पाणीटंचाई राहत होती . उन्हाळयात या गावी पाण्याचे टॅंकर पाठविणे ही नित्याचीच बाब झाली होती . पारडी- मिंडाळा – बाळापुर क्षेत्राचे जि.प. सदस्य यांच्या सततच्या पाठपुराव्याने व अथक प्रयत्नांमुळे अखेर कायमस्वरुपी पाणी टंचाईग्रस्त असलेल्या कोदेपार गावात तीन किमी. अंतरावरुन पाणी नळयोजनेद्वारे पोहचल्याने गावकरी आनंदीत झालेले आहेत .

कोदेपार गावात आवश्यक जलस्त्रोत नसल्याने असलेली पाणीटंचाई लक्षात घेत संजय गजपुरे यांनी यासाठी तीन वर्षाआधी एक कुपनलिका खोदून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण जलस्त्रोत कमी असल्याने याचाही फायदा गावकऱ्यांना होत नव्हता. मिंडाळा व कोदेपार या दोन्ही गावांच्या मध्यातून रेल्वेमार्ग असल्याने मिंडाळा येथील पाणीपुरवठा योजनेतून कोदेपारला पाणी देणे तांत्रिक दृष्ट्या अशक्य झाले होते. मिंडाळा येथील तत्कालीन सरपंच सौ. भाग्यश्री सतिश मांदाडे व उपसरपंच विनोद हजारे यांच्या मागणीनुसार पाणीटंचाई योजनेतून कोदेपार साठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत मंजुर करवून घेतली . कोदेपार गावात या योजनेमुळे तीन किलोमीटर अंतरावरील गोसेखुर्द योजनेच्या कुपनलिकेवरुन पाईपलाईद्वारे गावात पाणी आणायचे ठरले व त्यानुसार योजनेचे कामही पुर्ण करण्यात आले. नागभीडचे तहसिलदार मनोहर चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतरही ऐनवेळेवर गोसीखुर्दमधील कंपनीने पाणी देण्यास नकार दिल्याने मागील वर्षी पाणीपुरवठा होऊ शकला नाही .
अखेर संजय गजपुरे यांनी जि.प. चंद्रपुरचे तत्कालिन मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या माध्यमातुन जिल्हाधिकारी महोदयांकडुन नविन पाणी स्त्रोतासाठी विशेष निधी मंजुर करुन घेतला . रुपेश माटे यांच्या शेताजवळ नविन कुपनलिका खोदण्यात आली व माटे यांच्या संमतीने त्यांच्या शेतात सौरउर्जा पंप लावण्यात आला . अखेर आज सर्व बाबी पुर्ण करुन पाणी गावात पोहचल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .
यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जि.प. सदस्य
संजय गजपुरे यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे ही योजना कार्यान्वित झाली असुन कोदेपार ग्रामवासियांची पाणी टंचाई कायमस्वरुपी दुर होणार आहे. यासाठी मिंडाळा चे विद्यमान सरपंच गणेश गड्डमवार व गावकऱ्यांनी संजय गजपुरे यांचे आभार मानले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !