Home
HomeBreaking Newsरेल्वेच्या धडकेत अस्वल ठार...

रेल्वेच्या धडकेत अस्वल ठार…

राजुरा,(प्रतिनिधी)-
वनविभागाचे राजुरा वनपरिक्षेत्र च्या विहिरगाव उपक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मूर्ती बिटाचे कक्ष क्रमांक 200 मधून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गात रेल्वेच्या धडकेत एक अस्वल ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसाहायक नरेंद्र देशकर,वनरक्षक सायस हाके,संजय सुरवसे ,आणि वनमजुर घटनास्थळी पोहचून पंचनामा केला त्यानंतर राजुरा येथील काष्ठ आगारात आणून शवविच्छेदन करून जाळन्यात आले.
आजपर्यंत चुनाला ते विरुर दरम्यान या मध्य रेल्वे मार्गात रेल्वेच्या धडकेत अस्वल,चितळ,असे अनेक वन्यप्राण्यांचा नाहक बळी जात आहे हे अतिशय गंभीर बाब असून वनविभाग या वन्यप्राणी सुरक्षिततेबाबत गंभीर नसल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे आतातरी वनविभागानी वन्यजीव सुरक्षित राहतील याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !