जेष्ठ नेते भास्कर पाटील गड्डमवार यांचे निधन

44

 

साखरी ग्रा.प.चे माजी सरपंच, साखरी सेवा सहकारी सोसायटी चे माजी अध्यक्ष, जि.मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर माजी संचालक, भूविकास बँक चंद्रपूर चे माजी संचालक यांचे आज दिनांक 18 मे ला दुपारी 1.00 वा दीर्घ आजाराने निधन झाले.गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते अखेर त्यांची आज प्राणज्योत मालावली. स्व.भास्कर पाटील हे मुसद्दी राजकारणी तसेच सहकार क्षेत्रात त्यांचे वर्चस्व होते.माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओडख होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या मागे त्यांचे भाऊ ,पत्नी निर्मला,मुलगा किशोर व राकेश,सून,नातू,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या वर दिनांक 19 रोज गुरुवार ला सकाळी 8 वाजता साखरी या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे..