Home
Homeमहाराष्ट्रकुस्ती पहेलवान ओम चांदेकर यांचा सत्कार

कुस्ती पहेलवान ओम चांदेकर यांचा सत्कार

 

 

चंद्रपूर:-रंजन सामाजिक संस्था चंद्रपूर यांचे तर्फ़े कुस्ती पहेलवान ओम चांदेकर याला विदर्भ केसरी चषक अजिंक्यपद स्पर्धेत रजत पदक मिळाल्या बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमात संस्थेचे डॉ नंदकिशोर मैंदळकर,सुदर्शन नैताम,सचिन बरबटकर,गंगाधर गुरनुले, गौरव आक्केवार,गणेश भालेराव,रफिक शेख,स्वप्नील सुत्रपवर,नितीन चांदेकर,स्वप्नील गावंडे,पिंटू मुन,किशोर जंपलवार, मोहन जीवतोडे उपस्थित होते.

जगनगुरू व्यायाम शाळा येथील कुस्ती पहेलवान ओम चांदेकर ला 42 किलो वजन गटात रजत पदक मिळाले.देवळी येथे विदर्भ विभागीय कुस्ती संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा देवळी द्वारा आयोजित 36 वि विदर्भ केसरी चषक अजिंक्यस्पद घेण्यात आली 75 वि आझादीका अमृत महोत्सव ,खासदार क्रीडा महोत्सव पार पडला त्यात त्याला द्वितीय क्रमांक,रजत पदक प्राप्त झाले.

ओम चांदेकर हा प्रतिभावान खेळाडू आहे त्याने फारच कमी वेळात यश संपादन केले आहे घरची परिस्थिती जेमतेम आहे तरी सुद्धा मेहनत जिद्द चिकाटीने हे यश संपादन केले त्याचेवर खरी मेहनत घेतली ते जगनगुरु व्यायाम शाळेचे प्रशिक्षक बाळू कातकर व सुहास बनकर यांनी पुरस्काराचे स्रेय तो प्रशिक्षक व आई वाडीलाल देतो.भविष्यात चंद्रपूर व मार्गदर्शक गुरूंचे नाव उज्वल करण्याचे मानस ओम ने व्यक्त केले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !