Home
Homeमहाराष्ट्रमंगरमेंढा सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकित दुष्यंत मंगर व खुशाल लोडे गटाचा विजय

मंगरमेंढा सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकित दुष्यंत मंगर व खुशाल लोडे गटाचा विजय

 

सावली तालुक्यातील मंगरमेंढा सेवा सहकारी संस्थेवर राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार, सहकार क्षेत्राचे जाणकार दिनेश पाटील चिटनुरवर, प्रशांत पाटील चीटनुरवार समर्पित दुष्यंत मंगर/ खुशाल लोडे गटाचा सर्व १३ जागांवर विजय संपादन केले आहे.

सर्वसाधारण गटातून दुष्यंत मंगर यांना ६७ मते मिळाली, कृ. ऊ.बा.स. संचालक खुशाल लोडे यांना ६२ मते मिळाली. लुमाजी भोयर यांना ५९ मत, कैलास गंडाटे यांना ५७ मत, रामा मेश्राम यांना ५४ मत, मनोहर पालपनकर यान ५५ मते ढेबुजी तीवाडे यांना ५७ मत, विठ्ठल वाढनकर यांना ५६मत मिळाली. अनुसूचित जाती गटातून लोमेश टेंभुर्ण यान ६० मत, ओबीसी गटातून यशवंत मंगर यान ६१ मत, भटक्या विमुक्त गटातून होनाजी साखरे हे अविरोध निवडून आले, महिला राखीव गटातून पुष्पा कोहपरे ६१ मत, आशा वाघरे यांना ६१मत मिळाली १३ ही उमेदवार यांनी घव घावित विजय मिळविला. गुरुदास निसार या विरोधी गटाला अवघे ३० मतावर समाधान मानावे लागले.

१३ ही विजयी उमेदवारांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सदस्य दिनेश पाटील चिटनुरवार, प्रशांत पाटील चिटनुरवार, कृ. उ.बा. स. चे सभापती हिवराज पाटील शरकी यांनी अभिनंदन देऊन पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

हा विजय जांच्या मुळे झाला असे सायखेडा येथील सरपंच डांबाजी चौधरी, गुड्डू वाघरे, वसंत मंगर, घनश्याम मंगर, माल्लिक राऊत, कालिदास वाघरे देवाजी गंडाटे, रामदास गंडाटे, दिनकर पा. मंगर, चंद्रकांत मंगर, माणिक कोरडे, वाघरे, नरेश साखरे, विठ्ठल मंगर, आणि सायखेडा, मंगरमेंढा येथील काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा दिला.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !