Home
HomeBreaking Newsसिंदेवाही येथे पद्मशाली फाउंडेशन ची सभा संपन्न

सिंदेवाही येथे पद्मशाली फाउंडेशन ची सभा संपन्न

 

विदर्भातील पद्मशाली समाजात सामाजिक कार्य करणारी पद्मशाली फाउंडेशन परिवार वार्षिक सभा सिंदेवाही येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात आज दिनांक 15 मे ला पार पडली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज बोम्मावार होते. तर मंचावर पद्मशाली फाउंडेशनचे उपाध्यक्ष लोकेश परसावार, सचिव किशोर आनंदवार ,सहसचिव साईनाथ अल्लेवार, संचालक डॉक्टर बंडू आकनुवार,प्रशांत जिन्हेवार,रेड्डी अण्णा बोधनवार,अतुल कामनवार,सुरेश वासलवार, महेंद्र दुसावार उपस्थित होते.

यावेळी पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच महालक्ष्मी मंदिरातील देव देवतांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच कोविड व इतर काळात मृत्यू पावलेल्या समाज बांधवांना दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पद्मशाली फाउंडेशन हे पद्मशाली समाजाचा मध्ये सामजिक कार्य करीत असून त्यांनी केलेले कार्याचा व विविध कार्याचा आढावा यावेळी फाऊंडेशनचे सचिव किशोर आनंदवार यांनी मांडला.

तसेच पद्मशाली फाउंडेशनच्या वतीने पुढे काय कार्य करायचे आहे या संदर्भातून संपूर्ण संचालकांचे मते जाणून घेतली आणि विविध कार्यक्रमाचे नियोजन करून आयोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
यावेळी संचालक तुलसीदास तुम्मे, अनुप श्रीरामवार, प्रफुल तुम्मेवार,अमोल कुचनवार,नरेश अलसावार,मानतेश श्रीरामे,सतीश मार्गमवार, संतोष कोंकलवार,सुनील तालेवार, प्रशांत कटकमवार, विनोद कोटलवार,शंकर कटकूरवार, रवींद्र बोम्मावार, नंदू परसावार,संजय कोंडबतूनवार, आंनद आकनूरवार, अमोल कोंडावार,गिरीश परसावार,श्रीकांत कोकूलवार,मनोज तेलिवार,रवी चामलवार,संतोष सिलवेरी,प्रमोद कोकुलवार,अशोक तालकोकुलवार,गजानन बोम्मावार,स्वप्नील श्रीरामे,रुपेश मूलकवार,किशोर आईटलवार सह सावली,मूल,सिंदेवाही,चामोर्शी, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागपूर, घुगुस, बल्लारपूर, राजुरा,गडचांदूर, बेंबाळ,वणी, वरोरा,पांढरकवडा,यवतमाळ,भंडारा, अमरावती,एटापल्ली येथील मोठ्या संख्येने संचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपाध्यक्ष लोकेश परसावार यांनी केले संचालन प्रफुल्ल तुम्मेवार व अनुप श्रीरामवार यांनी तर तुलसीदास तुम्मे व अमोल कुचनवार यांनी आभार मानले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !