तेंदुपाने तोडण्यास गेलेली महिला वाघाचे हल्यात ठार,, ताडोबा बफर क्षेत्रातील घटना

49

 

राजुरा :(संतोष कुंदोजवार)- जंगलात तेंदूपता तोडायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . ताडोबा च्या बफर मधील सीताराम पेठ(भामढेली) जंगलातील घटना असून मृतक चं नाव जाईबाई जेंगठे ( 65 ) आहे , ही महिला ताडोबा लगत असलेल्या मोहूर्ली या गावातील रहिवाशी आहे .

गावात घटनेची माहिती पसरताच घटनास्थळावर एकच गर्दी केली , या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . घटनेची माहिती मिळताचं वन अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले आहे . सद्या तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू झाला आहे . गावातील सर्व नागरिक जंगलात तेंदूपत्ता संकलन करायला जातात . या घटनेमुळे अजून एकदा त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न समोर आला आहे .