Home
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना चंद्रपूर द्वारे मुख्य वनसंरक्षक यांचा...

महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना चंद्रपूर द्वारे मुख्य वनसंरक्षक यांचा दालनात वनरक्षक – वनपाल यांची तक्रार निवारण सभा पार पडली.

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
वनरक्षक वनपाल यांच्या समस्या निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री अजय पाटील यांचा चंद्रपूर दौरा नुकताच पार पडला. क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांचे दालनात तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 नुसार आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना एकतर पदोन्नतीचा लाभ मिळणेबाबत. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठता यादी उपलब्ध करून देणेबाबत. विभागीय चौकशी प्रकरणे निकाली काढणे बाबत. कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक अद्यावत करणेबाबत. प्रवास भत्ता वेतनवाढीची थकबाकी तसेच वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देणेबाबत. अंशदायी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत डीसीपीएस वार्षिक जमा प्रत कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत. गणवेश पुरवठा करणे बाबत. विभागाअंतर्गत वन कर्मचाऱ्यांचा विमा काढणे बाबत. कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरविणे बाबत. स्थायित्व प्रमाणपत्र, हिंदी मराठी भाषा सूट प्रमाणपत्र देण्याबाबत. वेतन निश्चितीत एकसुत्रता असणेबाबत. सेवाविषयक अडीअडचणी सोडण्याची कारवाई करणे बाबत. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात योजना व योजनेतर कामाचा निधी वर्ग करणे बाबत. वन संरक्षणार्थ क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देणे बाबत. पक्के सीमांकन व नकाशे तयार करून मिळणे बाबत. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकरिता नियमित कार्यशाळा आयोजित करणेबाबत. गोपनीय अहवालाची प्रत मिळणेबाबत. वन कल्याण निधीबाबत. वन कर्मचाऱ्यांना मोटरसायकल पुरवठा करणे बाबत. कर्मचाऱ्यांच्या पाल्यास स्कूल बसची सुविधा उपलब्ध करून देणेबाबत. निवासस्थानांची दुरुस्ती व नवीन बांधकाम करणे बाबत. इत्यादी विषयावर चर्चा करून वरिष्ठांकडे विषय मांडण्यात आले क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांनी वनरक्षक वनपाल यांच्या समस्या तात्काळ निवारण करण्याची कारवाई करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !