रामगां महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मार्गदर्शनपर व्याख्यान

51

सावली
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने भारतीय संविधान व भारतीय लोकशाही या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिनांक १० मे २०२२ आयोजीत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सौ. राजश्री मार्कंडेवार , तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रविन उपरे, कर्मवीर महाविद्यालय मुल तर अतिथीस्थानी डॉ. सचिन चौधरी उपस्थित होते.

प्रा.प्रवीन उपरे यांनी भारतीय संविधान हे देशाचाआत्मा असून संविधानाने देशाच्या लोकशाही शासन व्यवस्थेला मजबूत केले आहे म्हणूनच या विशालकाय भारत देशाचा राज्यकारभार सर्वांना समान न्याय व संधी देणार आहेत हे भारतीय लोकशाही व संविधानाची उपलब्धी आहे.असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी अध्यक्षीय भाषणातून भारतीय संविधानाला इतर देशांच्या तुलनेत श्रेष्ठ संविधान आहे असे नमूद केले राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक खोब्रागडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे संचालन विशाल मेश्राम यांनी तर आभार आशाली मोहुर्ले यांनी मानले कार्यक्रमाला , डॉ. रामचंद्र वासेकर, प्रा. महानंदा भाकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.