न्यू मॉडल स्कूल सुरू करा, शोध विचार वेध बहु संस्थेची मागणी.

36

 

शासनाने करोडो रुपये खर्चून शहरातील बालकाकरीता मॉडेल स्कूल करण्यासाठी देखणी इमारत बांधली. मात्र या इमारतीत नगर परिषदेने अजून पर्यंत शाळा सुरू न केल्याने, शासनाचे करोडो रुपये पाण्यात जातील काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चालू सत्रापासून नगरपरिषदेने ही शाळा सुरू करावी अशी मागणी मूल चे सामाजिक कार्यकर्ते गौरव शामकुळे यांचे नेतृत्वात बालक व पालकांनी केली आहे.
न्यू मॉडेल स्कूल नगर परिषद,मुल शहरातील नवीन बांधकाम करण्यात आलेली शाळा सुरू करण्याबाबत चिमुकल्यांनी पुढाकार घेतला आहे.

मुल नगर परिषदेने मॉडेल स्कूल उभारण्यात आलेल आहे, अतिशय देखणी इमारतीचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन होऊन तीन महिने कालावधी लोटून गेलेला आहे, येत्या 2022 -2023 सत्रात गोरगरिबांच्या मुलांसाठी स्कूल चालू झाले तर त्यांच भविष्य स्कूल मध्ये घडू शकेल, खाजगी कॉन्व्हेंटमध्ये फि देण्याची ताकद नसलेल्यांना मॉडेल स्कुलचा गोरगरिबांना फायदा होऊ शकतो.
आम आदमी पार्टी ने दिल्लीत सुरू केलेल्या शाळेच्या धर्तीवर मुल मध्ये गोरगरीब जनतेच्या मुलांचा भविष्याकरिता ही शाळा सुरू होणे आवश्यक आहे. तसा विचार मुल नगरपरिषद करेल यासाठी शोध विचारवेध बहुद्देशीय संस्था,मुल च्या वतीने नगर परिषद मुल ला निवेदन देऊन स्कूल लवकरात चालू करावा अशी मागणी करण्यात आली.