दुचाकीची दुचाकीला समोरासमोर धडक

78

 

कोरपना – दुचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक १० ला दुपारी चार वाजता च्या सुमारास कोरपना – गडचांदूर मार्गावरील माथा फाटा जवळ घडली.

पुरुषोत्तम घनश्याम मुसळे (३४) राहणार कळमना तालुका वणी,जिल्हा यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. ते कोरपना कडे येत असताना गडचांदूर कडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील सोहेल शेख (१८) , उमेश पेंदोर (१८) राहणार हातलोणी,तालुका कोरपना हे गंभीर जखमी झाले.

त्यांना कोरपना पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल केले. मात्र जखमी ची अवस्था अतिशय गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करित आहे.