पिपरी सेवा सहकारी संस्थेवर अध्यक्ष गणेश आवारी व उपाध्यक्ष अतुल मोहितकर यांची बिनविरोध निवड

64

 

दिनांक 10 मे 2022 ला सेवा सहकारी संस्था पिपरी ता. जिल्हा चंद्रपूर या संस्थेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवणुक संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली ,या निवडणूक मध्ये अध्यक्ष पदाकरिता गणेश जानबाजी आवारी याचा अर्ज होता तर उपाध्यक्ष करीत अतुल भैया मोहितकर यांचा अर्ज होता कोणाचाही अर्ज दोन्ही पदाकरिता नसल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोध झाली.

संचालक प्रमोद पाचभाई,संजय तुराणकर, सुधाकर मत्ते, पुंडलिक अडबाले, कपिल देवतळे, श्रीधर कावळे,बंडू मडावी, नितेश आवारी, प्रमोद ताटे, अर्चना दिलीप पाणघाटे, संगीत संजय निब्रड उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत गाडे यांनी पाहिले पिपरी येथील गावकरी मंडळी तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.