
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ भवनाच्या विकास कामासाठी राज्य शासनातर्फे ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी मंजूर होण्यात यासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

या निधीतून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राज्य शासनाच्या माध्यमातून पत्रकार संघाची वास्तू तयार आहे. मात्र, इमारत व परिसरात काही विकासकामे होणे बाकी होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आता तब्बल ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
निधी मंजूर करून दिल्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांच्या मार्गदर्शनात सोमवार, 9 मे रोजी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आभार व्यक्त केले. या वेळी संघाचे माजी अध्यक्ष बबन बांगडे, मुरलीमनोहर व्यास, सरचीटणीस सुनील तिवारी, उपाध्यक्ष वैभव पलिकुंडवार,रवि नागपुरे, विजय लडके उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पत्रकार बांधवांच्या पाठीशी नेहमीच उभा राहणार असल्याची ग्वाही आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिली.