तेंदुपाने संकलनासाठी गेलेल्या महिलेवर रानटी डुक्कराचा हल्ला…

44

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
आज दिनांक 9 मे रोजी सकाळी तेंदू पाने आणण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानटी डुक्कराचा कळपाने हल्ला करून गँभिर जखमी केल्याची घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे घडली शोभा तोडे असे जखमी महिलेचे नाव असून उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

आज सकाळी गावातील महिला सोबत तेंडुपाने आणण्यासाठी वन विकास महामंडळाचे कक्ष क्रमांक 80 मध्ये गेली होती पाने तोडीत असताना चार रानटी डुक्कराचा कळप या महिलांच्या दिशेने येत हल्ला चढविला त्यात शोभा तोडे ही गँभिर जखमी झाली शेजारील महिलांनी आरडाओरड करून डुक्कराना पळवून लावले आणि त्या महिलेस कोठारी येथील दवाखान्यात आणले वन विभागालाही याची माहिती दिली महिला गँभिर जखमी असल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

तेंदू हंगामात ग्रामीण लोकांना चांगला रोजगार मिळाला परंतु या मजुरांवर सतत वन्यप्राण्यांची हल्ला होत असल्याने मजूर लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे