राजुरा लगतच्या वरूर रोड गावातील युथ सोशल क्लब वर पोलिसांची धाड…

159

रोख रक्कमेसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त,८५ जुआरी अटकेत

राजुरा/विरुर (स्टे.)..
येतील मुख्यालयापासून सहा किमी अंतरावर असलेल्या वरूर रोड गावातील युथ सोशल क्लब वर पोलिसांनी रात्री ११.३० वाजता धाड टाकली.या धाडीच्या वेळी पत्ते खेळणाऱ्या तेलंगणा राज्यातील जुआरी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.या धडापटीत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.धाडीत १० लाख ७१ हजार ६९२ रोख रक्कमेसह १७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. क्लबच्या अध्यक्षसह ८५ जुआरी यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची चर्चा असल्याने या क्लब विरोधात लगतच्या शाळांनी व टेबुरवाही ग्राम पंचायत ने तक्रार केली आहे. या धाडीने राजुरा, मुल, गडचांदूर व चंद्रपूर मध्ये क्लब चालविणाऱ्या मध्ये मोठी खळबळ माजली आहे. ….सध्या जिल्ह्यातील काही शहरामध्ये क्लब सुरू असून त्यांना अधिकृत परवाना असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या क्लब मध्ये शर्ती व अटींचे खुलेआम उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आहे.पण पोलिसांच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान वरूर रोड गावात सुरू असलेल्या युथ सोशल क्लब मध्ये नियमांचा भंग करून दहा वाजल्यानंतर क्लब सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी रात्री धाड टाकली.त्यात तेलंगणा राज्यातील जुआरी पत्ते खेळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.या धाडीची कारवाई करीत असतांना उपस्थित जुआऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.या धडापाटीत काही पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान १० लाख ७१ हजार ६९२ रोख रक्कम व कार सह १७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. क्लब चा अध्यक्ष व्यंकटेश तोटा वय ३५ वर्ष,रा मंचेरीयाल तेलंगणा राज्यातील मंचेरीयल निवासी व्यंकटेश तोटा वय ३५ वर्ष यांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपी शेर श्रीकांत व श्रीनिवास गंगारेड्डी फरार झाले आहे.
व ८५ जुआरी आरोपींना ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावर
मुंबई जुगार कायद्या अंतर्गत कलम 4, 5 नुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर चे ठाणेदार राहुल चौहान व सहकारी करीत आहे. …आज घडीला राजुरा उपविभागातील राजुरा, गडचांदूर व गोंडपीपरी मध्ये क्लब सुरू असल्याची चर्चा आहे.यातील काही क्लब ला परवानगी असल्याचे सांगण्यात येत आहे तर काही क्लब हे अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे.हा उपविभाग महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सीमेलगत असल्याने लगतच्या तेलंगणा राज्यातील आंबट शौकीन जुगार खेळण्यासाठी येत आहे.यात दररोज लाखोंचा जुगार खेळल्या जात असल्याची माहिती आहे. मुळात नियमांना अधीन राहून क्लब चालविणे अपेक्षित असतांना अटी व शर्तीचे खुलेआम उल्लंघन करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.