राष्ट्रीय स्तरावर हॉकी साठी सचिन राजगडे ची निवड

45

 

सावली तालुक्यातील निमगाव येथील सचिन ऋषीजी राजगडे या युवकाची राष्ट्रीय स्तरावर हॉकी साठी निवड करण्यात आली आहे.या निवडी बद्दल निमगाव येथील ग्रामपंचायत मध्ये त्याचा सत्कार करण्यात आला.सचिन हा जिल्ह्यातुन निवड झालेला एकमेव खेळाळू आहे.

सद्या तो ब्रम्हपुरी येथे शिक्षण घेत आहे.लहान पनापासून खेळाची आवड असून त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे .
या निवडी बद्दल निमगाव येथील ग्रामपंचायत मध्ये सचिन राजगडे चा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला व ग्रामपंचायत चे पदाधिकारी व सदस्य उपस्तीत होते.सचिन च्या निवडी बद्दल सावली तालुका पत्रकार संघाने ही अभिनंदन केले आहे.