ग्राहकराजांच्या सुविधेसाठी महावितरणच्या लाईनमनचा तडपत्या उन्हाशी पंगा

68

 

 

सुर्य आग ओकत असतांना, चंद्रपूर सर्व जगात तापमानाचे उच्चांक मोडीत काढत आहे. एप्रिल मे महिण्यात अंगाची लाही लाही करणारे उन्ह ४६,४७ डिग्रीचे तापमान चंद्रपुरात काम करणारे सर्व लहान मोठे कर्मचारी त्यातच फिल्डवर काम करणारे यांची तर कठीण परिक्षाच घेत असते. महावितरणचे कर्मचारी म्हणजे त्यात पुन्हा खडतर परिक्षा. उन्हामुळे तापलेली वीजयंत्रणा व त्यावर बिघाड झाला की ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत झाला की तो कसाही करुन लवकर सुरु करण्याची जबाबदारी व ती पार पाडण्यास धजावलेला महावितरणचा ‘ लाईनमन ’.

गडचिरेालीसारखा दुर्गम प्रदेश, जंगल, दऱ्या खोरे, पहाडावर काम कधी वादळ कधी वारा, पूरपाऊस तर कधी कडयाक्याची थंडी. हे सर्व ऋतू एक प्रकारे महावितरणच्या कर्मचाऱ्याची परिक्षा पहात असतात. गडचिरेाली सारख्या दुर्गम जंगली भागात शकडो किमी वीजवाहिनीची देखभाल दुरूस्ती, तर कधी पावसात, नदी नाल्यातून गेलेल्या वीजवाहिण्या, इंसुलेटर्सची दुरूस्ती वीजग्राहकांची वीजपुरवठा लवकरात लवकर दुरूस्त होणे हे एकमेव ध्येयाने महावितरण लाईनमन काम करीत असतात. उन्हाळयात अनेकदा भार वाढला की वीजवाहिण्या अक्षरक्षा तापून वितळतात व वीजपुरवठा रात्री अपरात्री खंडीत होतो. वीजेरी, डिसचार्ज रॅाड, वितळतार इ. इत्यादी साधने घेवून लाईनमन रात्रीच कामास लागतो. चंद्रपूर वाघांचे नंदनवन, अशा या वाघासारखे हिंस्त्र प्राण्याच्या सानिध्यात रात्री अपरात्री वीजपुरवठा सुरळीत करावा लागतो. तर कधी शिकाऱ्यांनी लावलेल्या वीजेच्या सापळयापासून त्यांचे संरक्षण करण्यात वनाधिकांऱ्याना मदत करण्यासाठी त्यांना रानावनात जावे लागते.

भर उन्हात दुपारी ११ वा १२ ची वेळ किंवा संध्याकाळ, रात्र केव्हाही वीज पुरवठा खंडीत झाल्याची तक्रार सोडविण्यासाठी लाईनमन आपली, कवच कुंडले, रबराचेहातमोजे, डिस्चार्ज रॉड, हारनेस, झुला घेवून वीजेच्या खांबावर रोहित्रांवर काम करण्यासाठी सज्ज. वीजेच्या खांबावर चढतांना हातात मोजे घालून चढता येत नाही. अनेकदा हातही भाजतात. पण उन्हाच्या चटक्याची पर्वा लाईनमनने केली तर ग्राहकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतांत, वीजेवर अवलंबून असणरे कामधंदे ठप्प पडतात त्यामुळे तक्रार प्राप्त होताच ती सोडविण्यासाठी लाईनमनला जावे लागते ग्राहकांना प्रकाश प्रकाशाची भेट देतांना, त्यांन गर्मी होवूसुर्य आग ओकत असतांना, चंद्रपूर सर्व जगात तापमानाचे उच्चांक मोडीत काढत आहे. एप्रिल मे महिण्यात अंगाची लाही लाही करणारे उन्ह ४६,४७ डिग्रीचे तापमान चंद्रपुरात काम करणारे सर्व लहान मोठे कर्मचारी त्यातच फिल्डवर काम करणारे यांची तर कठीण परिक्षाच घेत असते. महावितरणचे कर्मचारी म्हणजे त्यात पुन्हा खडतर परिक्षा. उन्हामुळे तापलेली वीजयंत्रणा व त्यावर बिघाड झाला की ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत झाला की तो कसाही करुन लवकर सुरु करण्याची जबाबदारी व ती पार पाडण्यास धजावलेला महावितरणचा ‘ लाईनमन ’. आहे