
महाजीविका अभियानाअंतर्गत महिला सक्षमीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करणयासाठी उमेद महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभियांन पंचायत समिती,सावली अंतर्गत तालुक्यातील बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेले ( उत्पादित वस्तू विक्री करिता एकत्रित साहित्य उपलब्ध व्हावेत.महिलांच्या आर्थिक उत्पादनात वाढ व्हावी. ह्या उदेशाने व महिला बचत गटांना उत्पादनाचे साधन उपलब्ध करून द्यावयाचे उदेशाने वतीने पंचायत समिती सावली येथील उमेद अभियानाच्या वतीने परिसरात तालुका स्तरीय विक्री केंद्र (क्रॉप शॉप ) व चारगाव गावातील ओम शांती स्वयंम सहाय्यता समूहाच्या वतीने उपहार गृहाचे उदघाटन आज दि १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात आले .

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परीक्षित पाटील तहसीलदार सावली ,तसेचं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सुनीता मरस्कोले ,संवर्ग विकास अधिकारी पं .स सावली होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष लता लाकडे,आशीष बोरकर पोलीस निरीक्षक पो.स्टे. सावली, सागर कांबळे नायब तहसीलदार, आडे सहाय्यक संवर्ग अधिकारी, पं.स, सावली तसेच सर्व पंचायत समिती विभागातील अधिकारी व सावली चे नगरसेवक, कर्मचारी वृंद आणि संपुर्ण उमेद अधिकारी व कर्मचारी ,बचत गटातील महिला उपस्थित होते.
