
नवीन महाराष्ट्राची रचना करण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश यांच्या तत्कालीन मंत्री आणि अधिका-यांची एक बैठक मुंबई मुक्कामी २३ जून १९५६ रोजी झाली.
संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत असतांना आदरणीय यशवंतराव चव्हाण व भाऊसाहेब हिरे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होते, मात्र विदर्भाचे सर्व आमदार दादासाहेबांच्या पाठीशी उभे होते. दादासाहेब कन्नमवार जे म्हणेल ते मुख्यमंत्री अशी स्थिती होती. दादासाहेब विदर्भाचे पुरस्कर्ते होते, नेहरुजींच्या आग्रहास्त विदर्भावर अन्याय होणार नाही यासाठी नागपूर करार घेण्यास भाग पाडले. हा करार झाल्यावरच संयुक्त महाराष्ट्र तयार झाले. जर फाजल कमिशन लागू झाले असते तर विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री कन्नमवारच होते. मात्र त्यांनी आपले विदर्भातील सर्व आमदार यशवंतराव यांच्या पाठीशी उभे केले. आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले.

*१९५६ बैठकीत (डावीकडून उजवीकडे) विदर्भवादी मा.मारोतराव कन्नमवार, मा. पी. के. देशमुख, मा.यशवंतराव चव्हाण, मा.भाऊसाहेब हिरे,मा. मोरारजी देसाई, मा.विनायकराव कोराटकर,मा. मा.डी. जी. बिंदू,मा. एम. डी. भन्साळी, मा.पी.व्ही. आर. राव ही सर्व मंडळी उपस्थित होती*
*कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती,महाराष्ट्र*
