विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे 1 मे “विश्वासघात दिवस” म्हणून स्टिकर लावून पाळण्यात आला.

44

 

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
विदर्भ राज्य आंदोलन समिती राजुरा तर्फे 1मे “महाराष्ट्र दिन” हा विदर्भासाठी काळा दिवस/ विश्वासघात दिवस म्हणून पाळण्यात आला. काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करत सर्व सरकारी कार्यालयातील बोर्डावर तसेच परिवहन महामंडळाच्या बसेस वर महाराष्ट्र शासन ऐवजी विदर्भ शासन असे स्टिकर लावण्यात आले.

या आंदोलनात ऍड. मुरलीधरराव देवाळकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष युवा आघाडी कपिल इद्दे, दिनकर डोहे, रमेश नळे, शेषराव बोनडे, प्रभाकर ढवस, मधुकर चिंचोलकर, दिलीप देरकर, मारोतराव येरने, बळीराम खुजे, मधुकर जानवे, भाऊजी कंनाके, सुरज गव्हाणे, वैभव अडवे, उत्पल गोरे, देवानंद भांडारकर, अझर हुसेन, अशोक भगत, नामदेव गौरकर, विलास कोदिरपाल, बंडू कोडापे, गणेश काळे यांच्या सह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.