Home
Homeमहाराष्ट्रराजुरा येथे गायत्री शेंडे यांच्या ‘ऋणानुबंध’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

राजुरा येथे गायत्री शेंडे यांच्या ‘ऋणानुबंध’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

—————————-
राजुरा (प्रतिनिधी).
‌झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर(ग्रामीण) शाखा राजुरा च्या वतीने कवयित्री गायत्री प्रकाश शेंडे यांच्या ऋणानुबंध काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजुरा येथे झाले. ओम साईराम सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . नगरपरिषद.राजुराचे माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले तर प्रमुख अतिथी म्हणून झाडी बोली साहित्य मंडळाचे जिल्हा प्रमुख कवी अरूण झगडकर , नगरपरिषदच्या माजी शिक्षण सभापती वज्रमाला बतकमवार ,डाॕ.हेमचंद दुधगवळी , सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ पथाडे , कवी भाविक सुखदेवे ब्रम्हपुरी , तेजस गायकवाड (सोलापूर ) , कवयित्री रत्नमाला भोयर , शाखाध्यक्ष अॕड.सारिका जेनेकर उपस्थित होते.
‌झाडीबोली साहित्य चळवळीने अनेक नवोदितांना लिहिते करून त्यांना साहित्यिक अशी ओळख निर्माण करून दिली. भाषेला समृद्ध करायचे असेल तर बोलीचे संवर्धन होणे गरजेचे आहे,हा कवितासंग्रह नात्यातील संबंधाची सांगड घालणारा आहे ,असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.कवयित्री गायत्री शेंडे यांनी आपल्या मनोगतातून साहित्य निर्मितीचा प्रवास विषद केला
दुसऱ्या भागात कवयित्री प्रा.‌रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अॕड.सारिका जेनेकर व कवी डाॕ.किशोर कवठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कविसंमेलनात लक्ष्मण खोब्रागडे,प्रशांत भंडारे, वृंदा पगडपल्लीवार, जयंती वनकर,अनिल आंबटकर,सुनील बावणे,अर्जुमनबानो शेख,मंजुषा दरवरे,प्रा.प्रशांत खैरे,योगेश धोडरे,नंदकिशोर मसराम,उपेंद्र रोहणकर,प्रा.विनायक धानोरकर,संजीव बोरकर,दिलीप पाटील,डाॕ.अर्चना जुनघरे,सविता कोट्टी, प्रीती जगझाप,सरीता गव्हारे,सविता मालेकर आदींनी कविता सादर केल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा पेंदोर आणि संगिता बांबोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्य मंडळाच्या अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !