
वाघाच्या वाढत्या हल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडीमेढा उपवन क्षेत्रात येत असलेल्या चिकमारा येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली .
सविस्तर वृत्त असे की चिकमारा येथिल महिला तुळजाबाई परसराम पेंदाम(वय८९) ही महिला आपल्या नविन बांधकाम करत असलेल्या घरात झोपली असता
रात्रो सुमारे १२:३० वाघाने घरात घुसून महीलेला ठार केले.
सदर वाघाने महिलेला मारून नेत असताना खाटेचा आवाज आल्याने घराबाहेर झोपलेल्याना काहीतरी घटना घडली असल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहीले असता वाघाने तेथुन पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस स्टेशन सिंदेवाही च्या अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेला शवविच्छेदन करण्यासाठी रात्रौच सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यात वारंवार वाघाच्या हल्ल्यात मानवी जीवन धोक्यात आले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.याअगोदर सुद्धा सरडपार चक येथे गावात येऊन बिबट्या ने माणसाला ठार केले होते.
वांरवार गावात येऊन बिबट व वाघ हल्ले करत असल्याने जंगल शेजारी असलेल्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.