पाथरी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी मुकेश मेश्राम यांची तर उपाध्यक्ष पदी लोकेश चौधरी यांची निवड

104

 

पाथरी (नितीन अढिया )
सावली तालुक्यातील पाथरी सेवा सहकारी संस्था ची संचालक मंडळाची दिनांक 10/4/2022 रोजी एकूण 13 जागेसाठी निवडणूक पार पडली ही निवडणूक कॉँग्रेस समर्थीत किसान विकास प्यानलनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वाडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात व सावली तालुका कॉँग्रेस चे माजी अध्यक्ष आदरणीय राजेश सिद्धम यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली होती.

यामध्ये 13 पैकी 12 जागेवर दणदणीत विजय संपदीत करून आज दिनांक 27/4/2022 रोजी तालुका देखरेख सहकारी संस्था मर्यादित सावली येथे संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.

यामध्ये कॉँग्रेस समर्थीत किसान विकास प्यानलचे श्री मुकेश बाबुराव मेश्राम यांची अध्यक्ष म्हणून तर लोकेश कवडुजी चौधरी यांची उपाध्यक्ष म्हणून बहुमतानी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संपूर्ण सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.