
लोणच्याचे खमंग वास येऊन उपस्थितांच्या
तोंडी पाणी सुटत राहिल्या..

गृहिणींनी घरुन तयार करुन आणलेल्या ‘लोणचे’ कधी एकदा स्पर्धेच्या ठिकाणी मांडणी आणि सजावट करुन मोकळे श्वास घेऊ.. याच धडपडीत गृहिणींनी बाऊलमध्ये ‘लोणचे’ ठेवून मांडणी आणि सजावटी करण्यामध्ये दंग राहिल्या.. वेळ होती पाच मिनिटांची.. परिक्षण करण्यासाठी पूर्व भागात प्रसिद्ध असलेल्या A. P. फूड (पासकंटी लोणचे) किशोर पासकंटी आणि सौ. लक्ष्मी पासकंटी (सपत्नीक) यांनी येऊन स्पर्धेतील गृहिणींनी लोणचे बाऊलमध्ये ठेवून सजावट आणि मांडणी केलेल्या टेबलाकडे जाऊन प्रत्येक लोणचेचे परिक्षण करु लागले..
इकडे स्पर्धेतील गृहिणीं मध्ये धुसफूस चालू.. माझा पहिला नंबर येईल..? उपस्थित असलेल्या काहीजणांच्या तोंडातून पाणी सुटत होते. कारणही होतेच.. तब्बल १४ प्रकारच्या लोणचे होते स्पर्धेत.. हिंदू नववर्षाचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने गृहिणींसाठी घरुनच तयार करून आणण्याचे स्पर्धा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले होते.
पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर बहुद्देशीय मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महापौर श्रीकांचना यन्नम आणि बिटला ज्वेलर्सचे सुरेश बिटला यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरवात करण्यात आले.
याप्रसंगी महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या, फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या लोणचे स्पर्धेत सहभागी झालेल्या गृहिणींचे अभिनंदन करते. गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने भविष्यात आयोजित होणाऱ्या स्पर्धेत गृहिणी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन स्वतः मधील कला दाखवावे. असे आवाहन केल्या. बिटला ज्वेलर्सचे सुरेश बिटला म्हणाले, फाउंडेशनचे कार्य कौतुक करावे तितके थोडेच आहे. प्रत्येक वेळी अभिनव उपक्रम राबविण्यात येत असतो. आजचा कार्यक्रमही असाच आहे. गृहिणींनी तयार केलेल्या लोणच्यांना खमंग वास येत आहे. सदरच्या स्पर्धेत पारितोषिके मिळवणाऱ्या गृहिणींचे अभिनंदन म्हटले.
मिक्स लोणचे, कारले, टोमॅटो, काकडी, कैरी, मेथीदाणे, कोरफड, कैरी, टोमॅटो, आवळा, लिंबू, ओल्या हळदी कोरफड, कैरीच्या एकूण तीन प्रकार होते. शीतल लक्ष्मीकांत सोमाणी या प्रथम क्रमांक पटकावल्या, मधुरा शिवयोगी या दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या, प्रेमा नारायण सोमाणी या तिसरे विजेते ठरल्या तर उत्तेजनार्थ म्हणून पहिला क्रमांक कोमल चंद्रकांत अवताडे, दुसरा क्रमांक (विभागून) उमा गोवर्धन चिलवेरी, विजयालक्ष्मी भुमय्या कुरापाटी या विजेत्या ठरल्या आहेत. लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येईल. याची माहिती संबंधितांना कळविले जाईल.
अरिहंत इंग्लिश मेडियम स्कूल तर्फे प्रथम क्रमांक ३००१ /-रोख, फ्रोजन फूड मॉल तर्फे द्वितीय क्रमांक २००१ /-रोख, अजय म्याना तर्फे १००१ /-रोख उत्तेजनार्थासाठी कंदीकटला डाईंग वर्क्स तर्फे पहिल्या क्रमांकाला ५०० /-रोख तर, दुसरा क्रमांक विभागून ५०० /- देण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम (काका), उपाध्यक्ष श्रीनिवास कामुर्ती, श्रीनिवास रच्चा, श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेचे अध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, प्रा. अनुप अल्ले. यावेळी समर्थ बँकेचे उत्तम चिंताकिंदी, महेश वोंबटाक्के आणि विद्याधर सांजेकर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थानम यांचे विशेष सहकार्य लाभले.