
सावली -तालुक्यातील चकविरखल येथे स्व -नरेंद्रभाऊ तांगडे यांच्या प्रथम स्मूर्तीप्रित्यर्थ रक्तदान शिबीराचे दिनांक 26 एप्रिल ला आयोजन करण्यात आले. या शिबीरात 39 जणांनी पुढाकार घेत रक्तदान केले.

कांग्रेस चे युवा नेते तथा सर्वांचे चाहते असलेले स्व.नरेंद्र तांगडे यांचा कोविड मध्ये मृत्यू झालेला होता. त्यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्य चकविरखल येथील जिप शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.या रक्तदान शिबीराचे उदघाटन गडचिरोली जिल्हा कांग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माजी आमदार डाँ. नामदेव ऊसेंडी होते.
यावेळी शंकरराव सालोटकर, सावली तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी माजी अध्यक्ष राजेश सिद्धम , सुनिल चटगुलवार जिल्हा सचिव कांग्रेस कमेटी गडचिरोली ,पांडुरंगजी तांगडे,
सुनिलभाऊ बोमनवार सामाजीक कार्यकर्ता ,मुक्तेश्वर आभारे सरपंच गायडोंगरी, ईश्वरजी गंडाटे, गोविंदाजी बकाल, मंगलदास अलमस्त,मुखरु निकुरे, देवराव आभारे,शेखर नागापुरे उपस्तीत होते.
यावेळी 39 तरुण युवा रक्त दात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी
मिथुन बाबनवाडे , दिवाकर बाबनवाडे, मधुकर बट्टे , सुखदेव बाबनवाडे ,आंनदराव भोयर यांच्या सह अन्य युवकांनी व स्व.नरेंद्र तांगडे मित्र परिवार यांनी रक्तदान शिबीरासाठी अथक परिश्रम घेतले.
